वैरागवाडी, हसुरवाडी, हसुरसासगिरी, नरेवाडी, मनवाड, तेरणी, कवळीकट्टे भागात दौरा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ व प्रा. किसनराव चौगुले यांनी वैरागवाडी, हसुरवाडी, हसुरसासगिरी, नरेवाडी, मनवाड, तेरणी, कवळीकट्टे या भागात दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी सभासदांची सदिच्छा भेट घेत त्यांच्याशी सुसंवाद साधला.
यावेळी वैरागवाडी येथे बोलताना संचालक नवीद मुश्रीफ म्हणाले, ग्रामीण भागातील दूध संस्था या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखल्या जातात. शेतकरी शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुपालन करतात ग्रामीण भागातल्या दूध संस्थांनी दुधाची प्रतवारी चांगली ठेवल्यामुळेच गोकुळ दूध संघाची दुधाची प्रतवारी देखील उत्कृष्ट राहिली आहे. गोकुळ विषयी ग्राहकांच्या मनात विश्वासार्हता वाढली आहे. यामुळे सध्या गोकुळ दूध संघाच्या दुधाला मुंबई, ठाणे, पुणे येथे चांगली मागणी आहे.
यावेळी गोकुळचे संचालक प्रा. किसनराव चौगुले यांनी वासरू वासरू संगोपनाबद्दल विशेष माहिती दिली. ते म्हणाले, संघाने तीन वर्षात सहा वेळा उत्पादकांना दुध दरवाढ दिलेली आहे, म्हैस खरेदीसाठी 40 हजार अनुदान, वासरू संगोपन अनुदान, तसेच म्हैस खरेदीवर एक लाखाचा विमा लागू केलेला आहे. संघाने पाच वर्षात उत्पादकासाठी विविध योजना राबवल्यामुळे 14 लाखावरून 18 लाख 90 हजार लिटर दूध वाढ झाली याबरोबरच अण्णासाहेब पाटील मागासवर्गीय विकास महामंडळ दूध उत्पादकांना म्हैस अथवा गाय खरेदी करण्यासाठी बिनव्याजी कर्ज वाटप करत आहे. याचा लाभ दूध उत्पादकांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी वैरागवाडी येथील चाळोबा दूध व्यवसायिक संस्थेचे चेअरमन चंद्रकांत पाटील, संचालक भाऊसाहेब पाटील, महादेव पाटील, अशोक पाटील, जिजामाता महिला सहकारी दूध संस्थेच्या चेअरमन आशा सावंत, संचालक सीमा सावंत,सुरेखा गोते, राजाराम गोते उपस्थित होते.
संस्थेचे सचिव संभाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले सूत्रसंचालन अनिल बिरंजे यांनी तर मारुती कापसे यांनी आभार मानले.

