Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कागलमध्ये श्री शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ इंडिया आघाडीची पदयात्रा



कागल : कागल शहरांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार श्री शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ  इंडिया आघाडीकडून पदयात्रा काढण्यात आली.




या पद यात्रेचा प्रारंभ शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कागल बाजारपेठ, कागल शहरातून सर्वांना भेटून शाहू महाराजांना मतदान करा, हाताला मतदान करा असे सांगण्यात आले. यावेळी लोकांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, तालुकाप्रमुख शिवगोंड पाटील, तालुकाप्रमुख जयसिंग टिकले, सागर कोडेकर यांच्यासह शिवसैनिक, इंडिया आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.