Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'संत गजानन भरारी' सेंटरच्या मुलाखतीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद



गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागांव (ता.गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी येथील अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांची भरारी डिजिटल सोल्युशन्स कंपनीसाठी १७१ विद्यार्थ्यांची मुलाखती घेण्यात आली. यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


गेल्या पाच वर्षापासून या शिक्षण समूहाद्वारे चालू असलेल्या या भरारी डिजिटल सेंटर मधून बीपीओ व केपीओ च्या धर्तीवर काम चालते. यात परदेशातील कंपन्याला वेगवेगळ्या माहितीची डाटा एन्ट्री, डिजिटलायझेशन, सॉफ्टवेअर तयार करून हवे असते ते काम या सेंटरमधून होत आहे. ग्रामीण भागातील इंजिनिअरिंग व फार्मसीच्या विद्यार्थ्यांना या निमित्ताने रोजगारची संधी उपलब्ध झाली आहे. तेथे काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅनडा, स्पेन,आफ्रिका, अमेरिकेत रोजगारासाठी संधी मिळते. बॉम्बे बेस्ड असलेल्या या सेंटरचे काम तेरा देशांमध्ये चालते. भारतात केवळ संत गजानन शिक्षण समूहालाच या सेंटरची मान्यता मिळाली. यापुढेही या सेंटरसाठी हजारो पदांची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त डॉ. संजय चव्हाण यांनी सांगितले.


या कामी कार्यालयीन व्यवस्थापक शिरीष गणाचार्य, प्राचार्य डॉ. अन्सार पटेल, डॉ. अजिंक्य चव्हाण, प्रा. संतोष गुरव, प्रा. स्वप्नील हराळे, प्रा. रुक्कया देसाई यांचे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.