Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नेसरीला किशोरवयीन मुलींसाठी आरोग्यविषयी कार्यशाळा

गडहिंग्लज स्त्री रोगतज्ज्ञ संघटनेच्यावतीने आयोजन


विविध विषयावरील व्याख्यानाद्वारे केले मार्गदर्शन 



नेसरी  :  डॉ. प्रतिभा चव्हाण यांचा सत्कार करताना डॉ.अर्चना कोलेकर, सोबत ॲड. हेमंत कोलेकर, डॉ. गिता कोरे. 


गडहिंग्लज (प्रतिनिधी): नेसरी  येथील एस. एस. हायस्कूल व छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेजमध्ये गडहिंग्लज स्त्री रोगतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षा व संत गजानन शिक्षण समूहाच्या विश्वस्त डॉ. प्रतिभा चव्हाण व त्यांच्या सहकारी डॉक्टरच्या टीमने 'किशोरवयीन मुलींचे आरोग्य व मासिक पाळी' या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. याद्वारे  मार्गदर्शन करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. अर्चना कोलेकर तर संस्थाध्यक्ष ॲड. हेमंत कोलेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.



प्राचार्य एस. डी. लोहार यांनी स्वागत केले. यावेळी डॉ. प्रतिभा चव्हाण यांनी मुली व महिला यांच्या आरोग्याची वाढती समस्या, एचपीव्ही व्हॅक्सीनेशन, डॉ. सुप्रिया रुद्रापगोळ यांनी सकस आहार, डॉ. गीता कोरे यांनी योग व्यायाम व पॅड डिस्पोजल, डॉ. तानाजी पाटील यांनी पीसीओडी, एसटीडीएस याबद्दल विद्यार्थिनींना  मार्गदर्शन केले.





यावेळी एस.जे.कालकुंद्रीकर, एस. एच. पाटील, एस. व्ही. चव्हाण, एन. के. कातकर, रेंबुलकर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.