Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तुपूरवाडी ग्रामपंचायतीची शंभर टक्के करवसुली



गडहिंग्लज (प्रतिनिधी) : तुपूरवाडी ग्रामपंचायतीने घरफाळा  व पाणीपट्टी वसुली शंभर टक्के केली आहे. अशी माहिती सरपंच सौ. स्मिता संजय पाटील  व ग्रामसेवक योगेश बामणे यांनी दिली.



तूपुरवाडी ग्रामपंचायतीची स्थापना 1970 रोजी करण्यात आली. स्थापनेपासून यावर्षी 2023 -24 सालामध्ये घरफाळा व पाणीपट्टी शंभर टक्के करण्यात आली आहे. यासाठी सरपंच  सौ. स्मिता पाटील, उपसरपंच सौ सविता पाटील, सदस्य राजाराम पाटील, सौ लक्ष्मी पाटील, श्रीकांत पाटील, गोविंद रेडेकर, सौ. शैला पाटील यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी बाळाराम पाटील, माजी पदाधिकारी, ग्राम विकास मंडळ मुंबई  व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.