गडहिंग्लज (प्रतिनिधी): धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शाखा हसूरचंपू कार्यालय येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना शाखाप्रमुख राजू गोटुरे यांनी मनोगत व्यक्त केले.
उपशाखाप्रमुख चंद्रशेखर खवणे, विजय पवार, शाखेचे ज्येष्ठ शिवसैनिक संभाजी येरुडकर, संतोष फुटाणे, कल्लाप्पांना मस्ती, कोचरगे, सदाशिव मांग यांच्यासह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.