गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक दिवंगत खासदार व्ही.टी.पाटील यांना पुण्यदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
प्रारंभी खासदार व्ही. टी. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन हिरलगेचे उपसरपंच अश्चिन यादव यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम तर शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले यांनी केले.
यावेळी सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांनी मार्गदर्शन करताना ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक दिवंगत खासदार व्ही. टी. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान मोलाचे आहे. त्यांनी ताराराणी विद्यापीठ, मौनी विद्यापीठ व शिवराज विद्या संकुलाची निर्मिती केली आहे. या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली आहे. तत्कालीन खासदार व्ही. टी. पाटील यांनी आमचे वडील बंधू आदरणीय कुराडे सर यांच्यातील नेतृत्व क्षमता पाहून शिवराज विद्या संकुलाची जबाबदारी सोपवली आहे. शिवराज विद्या संकुलाच्या माध्यमातून आजही व्ही.टी. काकांचा वारसा पुढे चालवित असल्याचे सांगून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिवराज विद्या संकुल प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष दिग्विजय कुराडे, प्रा. सौ. बिनादेवी कुराडे, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. राहुल मगदूम यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.