गडहिंग्लज (प्रतिनिधी): नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतीमार्फत १५ व्या वित्त आयोगमधून मोफत महिला कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम पार पडले.
कलावती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गडहिंग्लज यांच्या सहयोगाने कापडी पिशवी, रेग्जीन बॅग, प्रवाशी बॅग, हॅण्ड पर्स, वन साईड पर्स, भाजीची पिशवी, छोटी फॅन्सी बॅग, टाकाऊ कापडापासून टिकाऊ कापडी बॅग कशी बनवायची इत्यादी अनेक प्रकारच्या कापडी पिशव्या तयार करून महिला बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय कसा करायचा याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी प्लास्टीक पिशव्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी कापडी पिशवी का गरजेची आहे? त्याचे महत्व पटवून देण्यात आले.
यावेळी सरपंच सौ. सुप्रिया कांबळे, उपसरपंच विकास मोकाशी, ग्रामविकास अधिकारी पी. बी. पाटील, ग्रामपंचायत सदस्या सौ. रेखा नार्वेकर, सौ. माधूरी कासारकर, सौ.सुनिता लोहार, कलावती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अध्यक्ष सौ. शितल सासने, सचिव विनोद सासने, प्रशिक्षिका सौ.अनिता टोणपी व महिला वर्ग उपस्थित होत्या.