गडहिंग्लज (प्रतिनिधी): भडगांव ग्रामपंचायत मार्फत 'क' वर्ग पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाणाऱ्या श्री गुडादेवी मंदिराची स्वच्छता करण्यात आली.
यावेळी झाडलोट करून पाण्याच्या साह्याने मंदिरातील फरशीची स्वच्छता करण्यात आली. त्याबरोबरच मंदिर परिसरातील कचरा गोळा करून साफसफाई करण्यात आली. यावेळी सरपंच सौ. वंदना शेंडुरे, उपसरपंच रविशंकर बंदी, रविंद्र शेंडुरे, दिपक कोरी, सचिन पाटील, अर्चना पटणकुडी, संगीता विभूते, राजू कल्याणी, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गवळी, सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्या व कर्मचारी उपस्थित होते.