प्रदेश सरचिटणीसपदी डॉ. आसिफ शेख यांची नियुक्ती
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने प्रदेश उपाध्यक्षपदी ए. वाय. पाटील यांची तर बाबासाहेब पंडितराव पाटील (आसुर्लेकर) यांची कोल्हापूर (ग्रामीण) जिल्हाध्यक्षपदी आणि प्रदेश सरचिटणीसपदी डॉ. आसिफ शेख यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे.
ए. वाय. पाटील, बाबासाहेब पाटील, डॉ. आतिफ शेख हे पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी निश्चित सहकार्य करतील, असा विश्वास राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे व्यक्त केला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, आमदार अमोल मिटकरी, प्रदेश सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, उपाध्यक्ष संजय खोडके, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.