मुगळीच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन
जरळी (वार्ताहर): विद्यार्थ्यांनी आतापासूनच आपल्याला भविष्यात काय व्हायचे आहे हे ठरवून ध्येय निश्चित करावे. मोबाईलचा अतिवापर टाळून अभ्यासाकडे लक्ष द्यावे व आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे असे आवाहन कोल्हापूर येथील पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब पालखे यांनी मुगळी येथे केले.
मुगळी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण व विविध गुणदर्शन समारंभ सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका आर.ए. पाटील होत्या. सुरुवातीला सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. बालिका दिनानिमित्त बालिकांचा सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत मार्फत शाळेतील पाच मुलींना दत्तक घेण्याचे जाहीर केले. यावेळी शाळेसाठी देणगी दिलेल्या देणगीदारांचा सत्कारही करण्यात आला.
या कार्यक्रमास सरपंच मलिकार्जुन आरबोळे, संतोष भोसले, बी.जी. स्वामी, यशवंत भोसले, वर्षा घोटणे, महानंदा कटकोळे, वसंत घोटणे, परशुराम कांबळे, चंद्रकांत माने, बसवराज धनवडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन कमिटी, माजी विद्यार्थी, पालक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.