Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजच्या संभाजीराव माने कॉलेजमध्ये पालक मेळावा संपन्न



गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेजच्या अकरावी सायन्स विभागाचा पालक मेळावा संपन्न झाला. अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे होते. तर प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.



प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रा.ए.बी. कोकणे यांनी केले. या कार्यक्रमात पालक प्रतिनिधी फारुक ठगरी यांनी आज मोबाईलमुळे पुढची पिढी बरबाद होऊ नये ही दक्षता सर्वांनी घेणे काळाची गरज आहे. पालकांनी आपल्या पाल्यांबाबत वेळीच दक्ष राहिले पाहिजे. शिवाय आपल्या पाल्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे. त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.


शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये शिवराज विद्या संकुलामध्ये विद्यार्थ्यांना करिअर घडविण्याची खूप संधी आहेत. विद्यार्थ्यांनी करिअरला दिशा देण्यासाठी शिवराज विद्या संकुलामध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध कोर्सेसचा लाभ घेऊन आपले भवितव्य घडवावे. पालकांनी आपल्या पाल्याबाबत वेळीच दक्ष राहून आपल्या पाल्याचे करिअर कसे घडविता येईल याबाबत पालकांशी संवाद साधणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.



यावेळी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी पालकांनी आपल्या पाल्याबाबत वेळीच दक्ष राहणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये असणारे कौशल्य जाणून घेऊन त्याला आवश्यक असे प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. महाविद्यालयात वेळोवेळी भेट देऊन आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा संबधित शिक्षकांकडून घेणे आवश्यक असल्याचे सांगून सविस्तरपणे मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक प्रा.टी.व्ही. चौगुले, पालक प्रतिनिधी प्रा. सौ. क्रांतीदेवी शिवणे यांनी देखील मार्गदर्शन केले. यावेळी पालक बाळकृष्ण भाग्यवंत, जितेंद्र कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विना-अनुदानित ज्युनिअर विंगचे प्रमुख प्रा. संदीप कुराडे यांच्यासह सर्व प्राध्यापक, बहुसंख्य पालक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. विद्या पाटील, प्रा. स्मिता पाटील यांनी केले तर आभार प्रा. जे.बी. दोरुगडे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.