नवी दिल्ली : आमचे सरकार महिलांच्या सन्मानासाठी आणि सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
इंडिया पोस्टने सुरू केलेले “महिला सन्मान बचत पत्र” हे याचे उत्तम उदाहरण असल्याचेही मोदी यांनी सांगितले. वित्त मंत्रालयाने, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, 2023 साठी राजपत्र अधिसूचना जारी केली आहे. आणि तात्काळ प्रभावाने 1.59 लाख टपाल कार्यलयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ निमित्त केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती आणि हे मुलींसह महिलांच्या आर्थिक समावेशनाच्या आणि सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
इंडिया पोस्टच्या ट्विट शृंखलेला प्रतिसाद देताना, पंतप्रधानांनी ट्विट केले की, "आमचे सरकार महिलांच्या सन्मानासाठी आणि सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे आणि "महिला सन्मान बचत पत्र" हे याचे उत्तम उदाहरण आहे.

