गडहिंग्लज (प्रतिनिधी): निलजी (ता.गडहिंग्लज ) येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त एकता गृपच्या वतीने आयोजीत भव्य खुल्या धावणे स्पर्धेत ओंकार पोवार यांनी प्रथम क्रमांक पटकावले.
या स्पर्धेत द्वितीय ओंकार कुंभार, तृतीय शिवराज घोलराखे, चतुर्थे क्रमांक कार्तीक रुपनार यानी मिळवले. विजेत्याना देवस्थान कमिटी व मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. यावेळी सुशांत पाटील, शशिकांत पाटील, आदर्श शिंदे, अनिकेत पाटील, हर्षद गवळी,ओंकार जरळी, संजय कुरबेट्टी, विशाल उप्पार,समीर नदाफ, प्रभाकर दास, भूषण पाटील, अजय गडकरी आदी उपस्थित होते.

