गडहिंग्लज (प्रतिनिधी): निलजी (ता. गडहिंग्लज) येथील रोहित चनगोंडा पाटील यांची महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात ज्युनिअर इंजिनिअर (वर्ग दोन) पदी नियुक्ती झाली. शासनाने सरळसेवेद्वारे ऑगस्ट 2022 मध्ये या पदासाठी परीक्षा घेतली होती यात जनरल कोट्यातून ही नियुक्ती झाली.
रोहित यांचे प्राथमिक शिक्षण गावातून तर इंजिनिअर पदविकेचे शिक्षण महागावच्या संत गजानन महाराज पॉलिटेक्निक मधून तर पदवीचे शिक्षण पिंपरी (पुणे) येथील डी.वाय.पाटील महाविद्यालयातून झाले. त्यांना शिक्षकांचे मार्गदर्शन तर आई-वडील व बहिण यांचे प्रोत्साहन मिळाले. या यशाबद्दल रोहीत यांचे कौतुक होत आहे.

