गडहिंग्लज (प्रतिनिधी): दुंडगे येथील सनी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ व सनी वाचनालय यांच्या वतीने हनुमान जयंती निमित्त उद्या दिनांक ६ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी सहा वाजता श्री हरिभक्त भजनी मंडळ यांच्याकडून जन्मोत्सव कार्यक्रम पार पडणार आहे. सायंकाळी सात वाजता कडलगे येथील सिदलिंगेश्वर मठाचे जगद्गुरु आडी सिद्धेश्वर महास्वामीजी यांचे आशीर्वचन होणार आहे. रात्री साडेआठ वाजता सर्व ग्रामस्थ, तरुण मंडळाच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

