गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात एन. सी. सी. विभाग, क्रीडा विभाग, ५६ महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी कोल्हापूर, आण्णासाहेब गळतगे लायन्स ब्लड बँक, शिवराज फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त व जागतिक आरोग्य दिनाच्या औचित्याने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिराचे उदघाटन सचिव डॉ.अनिल कुराडे व प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनीसह बी. सी. ए व बी. सी. एस. च्या विद्यार्थी-विद्यार्थिनीनी रक्तदान केले. या शिबिरात ७१९ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, 'गोडसाखर'चे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, गळतगे लायन्स ब्लड बँकेचे चेअरमन आण्णासाहेब गळतगे यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक एन.सी.सी.विभाग, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. राहुल मगदूम यांनी केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये शिवराज महाविद्यालय आपल्या विविध उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासत असते. त्याचा समाजाला उपयोग व्हावा हा उद्दात्त हेतू आम्ही नेहमी जपला आहे. आज जागतिक आरोग्य दिनाच्या औचित्याने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले आहे हे आम्हास अभिमानास्पद आहे. अशा सामाजिक उपक्रमात मुलींचा हा सहभाग सर्वांना प्रेरणा देणारा आहे असे स्पष्ट करून या उपक्रमाचे कौतुक केले.
या संपूर्ण उपक्रमाचे संयोजन यशस्वीपणे करण्यासाठी एन. सी. सी. कॅडेट व क्रीडा विभागाच्या खेळाडूंनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी प्रा.सौ.बिनादेवी कुराडे, प्रा.रवी खोत, प्रा.बुलंद पठाण यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यासह ब्लड बँकेचे डॉ.सुभाष पाटील व सर्व स्टाफ उपस्थित होते. आभार प्रा.जयवंत पाटील यांनी मानले.






