गडहिंग्लज (प्रतिनिधी): शाश्वत विकास ध्येयांची स्थानिकीकरण अंतर्गत संकल्पना आधारित प्रशिक्षण कार्यक्रम गडहिंग्लज तालुक्यात दिनांक 27 मार्च ते 30 मार्च अखेर संपन्न झाला. सदरचे प्रशिक्षण सात ठिकाणच्या हॉलमध्ये एकाचवेळी घेण्यात आले. यामध्ये नेसरी, महागाव व गडहिंग्लज येथे पाच ठिकाणी कार्यशाळा घेण्यात आली
ही कार्यशाळा प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या संकल्पनांवर काम करण्यासाठी घेण्यात आली. हा कार्यक्रम 2030 पर्यंत चालणार आहे. कार्यशाळा पार पाडण्यासाठी गटविकास अधिकारी शरद मगर, विस्तार अधिकारी के.एन.खटावकर , ए. एस.जजरवार, आर.बी.दड्डीकर यांनी नियोजन केले होते.
हा कार्यक्रम जिल्ह्यामध्ये यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था कोल्हापूरच्या प्राचार्य दिपाली पाटील, सय्यद यांचेही मोलाचे मार्गदर्शन व सहकार्याने प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाला.
संयुक्त राष्ट्र संघाने स्वीकारलेली शाश्वत विकासाची ध्येय 2030 पर्यंत साध्य करण्यासाठी केलेल्या आंतरराष्ट्रीय करारावर स्वाक्षरी करणारा भारत हा एक देश असून पंचायत राज मंत्रालय भारत सरकार यांनी ग्रामपंचायत स्तरावर लोकसहभागाद्वारे ही शाश्वत ध्येय स्थानिक नियोजनाच्या माध्यमातून साध्य करण्याचा संकल्प केलेला आहे.भारतातील 70 टक्के लोकसंख्या ही खेड्यांमध्ये ग्रामीण भागात राहत असल्याने ही ध्येय साध्य करण्यासाठी नऊ संकल्पना निश्चित केलेल्या आहेत.
गडहिंग्लज तालुक्यातील सदरचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रवीण प्रशिक्षक म्हणून काशिनाथ मोरे, शिवाजी गुरव, विलास ओवळकर, माधुरी सावंत, शुभांगी देसाई, आनंदा शिंदे, अक्षय आदित्य, समीर पाटील आदींनी कामगिरी पार पाडली. या कालावधीमध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रत्येक गावात ग्रामविकास केला जाईल असे सरपंच, ग्रामसेवक, शिक्षक, अशा, अंगणवाडी सेविका यांनी सांगता समारंभात आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले. ही कार्यशाळा प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या संकल्पनांवर काम करण्यासाठी घेण्यात आली.





