Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज नगरपरिषद मार्फत ई- रिक्षा लोकार्पण सोहळा उत्साहात


गडहिंग्लज (प्रतिनिधी): 
गडहिंग्लज नगरपरिषद मार्फत ई- रिक्षा लोकार्पण सोहळा डॉ. प्रकाश अनंत गुणे व सौ. अनुराधा प्रकाश गुणे यांच्या हस्ते पार पडला. 

गडहिंग्लज नगरपरिषद मार्फत माझी वसुंधरा अभियान ३.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२३ ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर अभियान अंतर्गत अग्नि, वायू, पृथ्वी , जल, भूमी या पंचतत्वावर आधारित विविध जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. वायू या घटकांतर्गत इलेक्ट्रिक वाहनाचा वापर व त्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. डॉ. अनंत बाळकृष्ण गुणे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून डॉ. प्रकाश अनंत गुणे व सौ. अनुराधा प्रकाश गुणे यांनी गडहिंग्लज नगरपरिषदेस एकूण रु. ४ लाख किमतीची ई- रिक्षा भेट दिली.

सदर ई- रिक्षाद्वारे शहरात विविध जनजागृती कार्यक्रम, प्रचार व प्रसिद्धी तसेच जाहीर आवाहन करण्यास सोयीचे होणार आहे. यासोबत प्लास्टिक बंदी बाबत प्रबोधन करण्यास मदत होणार आहे. सध्या नगरपरिषद मार्फत भाड्याने रिक्षा घेऊन प्रचार व प्रसिद्धीचे कामे करण्यात येतात. याकरिता नगरपरिषदेला आर्थिक बोजा पडत आहे. ई- रिक्षा उपलब्ध झाल्याने नगरपरिषदेचा खर्च कमी होणार आहे.

ई- रिक्षा इंधन म्हणून चार्जिंग करणे आवश्यक असून नगरपरिषदेच्या चार्जिंग स्टेशनच्या ठिकाणी चार्जिंग करण्यात येणार आहे. नगरपरिषदेचे चार्जिंग स्टेशन पूर्णपणे सौर उर्जेवर कार्यरत आहे. यामुळे नगरपरिषदेला कोणताही खर्च करावा लागणार नाही. नगरपरिषदेने विद्युत वाहने वापरण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पर्यावरणाला प्रदूषण मुक्‍त होणेस मदत होणार आहे. या पार्श्वभूमीवर  नगरपरिषदेच्या प्रांगणात डॉ. प्रकाश अनंत गुणे यांचे कडील सीएसआर निधीतून ई- रिक्षा लोकार्पण सोहळा पार पडला.

यावेळी माजी नगराध्यक्षा  सौ. स्वाती महेश कोरी, बसवराज खणगावे, नरेंद्र भद्रापूर, महेश कोरी, सौ. सुनिता पाटील, सौ. विना कापसे, सौ. नाज खलिफा, वाहन विभाग प्रमुख अनिल गंदमवाड,  रविनंदन जाधव, धनंजय चव्हाण, निखील पाटील, प्रशांत शिवणे, चेतन रेगडे, संतोष मराठे यांच्यासह नागरिक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नागरिकांनी विद्युत वाहनांचा वापर करावा : मुख्याधिकारी स्वरूप खारगे 

गुणे कुटुंबीयांनी पालिकेत ई- रिक्षा दिल्याबद्दल मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी आभार मानले. शहरातील नागरिकांनी माझी वसुंधरा अभियान अंतर्गत विविध कार्यक्र राबविण्यास प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच गडहिंग्लज शहरात सर्वांनी विद्युत वाहनांचा वापर करावा. जेणेकरून शहर प्रदूषणमुक्त होण्यास मदत होईल. असे आवाहनही मुख्याधिकारी खारगे यांनी यावेळी केले. 

शहरातून 'स्वच्छता मशाल मार्च'

यावेळी गडहिंग्लज नगरपरिषद मार्फत स्वच्छोत्सव २०२३ अंतर्गत स्वच्छता शपथ घेण्यात आली. तसेच शहरात 'स्वच्छता मशाल मार्च' काढण्यात आली. यावेळी शहरातील नागरिक, महिला व बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यानिमित्ताने स्वच्छतेमध्ये काम करणाऱ्या महिलांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

बातमीचा व्हिडिओ येथे पहा 👇🏼




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.