Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

प्रस्तावित वीज दरवाढ विरोधात राज्यभर आंदोलन

 मोर्चा, निदर्शने, धरणे व वीज दरवाढ प्रस्तावाची होळी

राज्य सरकारला दिले निवेदन


मुबंई :
प्रस्तावित वीज दरवाढी विरोधात राज्यभर वीज ग्राहकांनी ठिकठिकाणी आंदोलन करत विरोध केला. मोर्चा, निदर्शने, धरणे व वीज दरवाढ प्रस्तावाची होळी करत आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन यशस्वी झाल्याची माहिती वीज ग्राहक व औद्योगिक संघटना राज्यस्तरीय समन्वय समिती निमंत्रक प्रताप होगाडे यांनी दिली.

इचलकरंजी येथील वीज दरवाढ प्रस्ताव होळी आंदोलनात माजी खासदार राजू शेट्टी, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे प्रताप होगाडे, जाविद मोमीन, महाराष्ट्र स्टेट बुनकर फेडरेशनचे पुंडलिक जाधव,राष्ट्रवादी काँग्रेसचे मदन कारंडे,राष्ट्रीय काँग्रेसचे संजय कांबळे, शिवसेना (ठाकरे गट) महादेव गौड, ताराराणी पक्षाचे प्रकाश दत्तवाडे, जनता दल (सेक्युलर)चे पद्माकर तेलसिंगे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. सदा मलाबादे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवीण पाटील,भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. आनंदा गुरव, दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे चंद्रकांत पाटील, यंत्रमागधारक जागृति संघटनेचे विनय महाजन, कोल्हापूर जिल्हा पॉवरलूम असोसिएशनचे दिनकर आनुसे, एअरजेट लूम ओनर्स असोसिएशनचे राजगोंडा पाटील, इचलकरंजी शटललेस लूम ओनर्स असोसिएशनचे श्रीकांत कबाडे, इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशनचे काशीनाथ जगदाळे, भाजपा विणकर आघाडीचे दिपक राशीनकर, वेस्टर्न महाराष्ट्र प्रोसेसर्स असोसिएशनचे संदीप मोघे, श्री लक्ष्मी इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे महेश दाते, इचलकरंजी को ऑप. इंडस्ट्रियल इस्टेटचे राहुल खंजीरे, स्वाभिमानी यंत्रमागधारक संघटनेचे विकास चौगुले, खर्चीवाले यंत्रमागधारक संघटनेचे धर्मराज जाधव, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरचे मुकुंद माळी,इचलकरंजी सायझिंग को ऑप सोसायटीचे दिलीप ढोकळे,राष्ट्रीय विणकर सेवा संघचे सुनील मेटे, तांबे माळ यंत्रमागधारक संघटनेचे बंडोपंत लाड, रेंदाळ पॉवरलूम असोसिएशनचे रावसाहेब तांबे, पश्‍चिम महाराष्ट्र यंत्रमाग सहकारी संघचे सुनील तोडकर, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट को ऑप. टेक्स्टाईल्स फेडरेशनचे मिलिंद कांबळे, इचलकरंजी किरकोळ किराणा असोसिएशनचे संतोष पाटील, यार्न वायंडिंग असोसिएशनचे सुनील सरबी,पार्वती को ऑप. इंडस्ट्रियल इस्टेटचे दामोदर मालपाणी, पार्वती मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अनिल बागणे,व्यापारी संघटनेचे मोहन भोसले, शिक्षण संस्था संघचे नंदकुमार इनामदार सहभागी झाले होते.

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा- कोल्हापूर-औद्योगिक संघटना, कोल्हापूर-जिल्हा इरिगेशन फेडरेशन, इचलकरंजी सर्व पक्ष व संघटना, राधानगरी सांगली जिल्हा - विटा, सातारा, सोलापूर, पुणे जिल्हा, पुणे शहर, शिरूर, कोकणात सिंधुदुर्ग जिल्हा- कणकवली, देवगड, रायगड जिल्हा - अलीबाग, पालघर, ठाणे जिल्हा - भिवंडी, वसई, वसईविरार मनपा,  मुंबई - मंत्रालय एरीया, नाशिक विभाग, नाशिक, धुळे,अहमदनगर जिल्हा -अहमदनगर, श्रीरामपूर, नंदुरबार जिल्हा - नवापूर, जळगांव, मराठवाडा, नांदेड, हिंगोली जिल्हा - आखाडा बाळापूर, विदर्भ- नागपूर, यवतमाळ, बुलढाणा जिल्हा-नांदुरा, शेगाव आदी ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.