Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत गडहिंग्लजला उद्या शिवसंवाद मेळावा

गडहिंग्लज उपविभागातील शिवसैनिकांमध्ये उत्साह

शिवसैनिकांकडून मेळाव्याची जय्यत तयारी 


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत गडहिंग्लज येथे बुधवार दिनांक १ मार्च रोजी शिवसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ठाकरे गट शिवसेनेच्या बैठकीत देण्यात आली. या मेळाव्यात खासदार राऊत शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. 

सकाळी १० वाजता गडहिंग्लज येथील सूर्या सांस्कृतिक हॉलमध्ये होणाऱ्या या शिवसंवाद मेळाव्याला खासदार संजय राऊत मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी खासदार प्रियांका चतुर्वेदी, आमदार बाबुराव माने, प्रवक्ते लक्ष्मण हाके, युवा नेते विक्रांत जाधव, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांचीही उपस्थिती असणार आहे अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

या बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे,  डॉ. रियाजभाई शमनजी, तालुकाप्रमुख दिलीप माने, शहर प्रमुख संतोष चिकोडे, डॉ.सतीश नरसिंग, युवा सेनेचे जिल्हा समन्वयक प्रतीक क्षीरसागर, संदीप कुराडे, सुलोचना रेडेकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. या शिवसंवाद मेळाव्याला  गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड, कागल विभागातील शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.