गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेजचा अर्णव मच्छिंद्र बुवा या विद्यार्थ्याने कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजित वामनदाजी शास्त्रीय संगीत स्पर्धेमध्ये शास्त्रीय संगीत गायनात प्रथम क्रमांक पटकाविला.
प्रतिष्ठानच्यावतीने त्रिसूत्री संगीत महोत्सवात प्रसिद्ध शास्त्रीय गायिका पंडिता शुभा मुदगल यांच्या हस्ते अर्णव बुवा याला चषक, प्रमाणपत्र व रोख दहा हजार रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सचिव डॉ.अनिल कुराडे यांच्या हस्ते अर्णव याला गौरविण्यात आले. सदर विद्यार्थ्याला संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ.अनिल कुराडे, प्राचार्य डॉ. एस.एम.कदम, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे यांचे प्रोत्साहन तर प्राचार्य मच्छिंद्र बुवा, पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.