गडहिंग्लज (प्रतिनिधी): लिंगायत संघर्ष समितीच्या गडहिंग्लज तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बसवराज आजरी यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते श्री.आजरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, उदयराव जोशी, महेश सलवादे, संग्रामसिंह कुपेकर, शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, रामगोंडा पाटील उपस्थित होते.
येथील जडिय सिद्धेश्वर आश्रम बेलबाग व समाज बांधव यांच्यावतीने म.नी.प्र.संपादन महास्वामीजी चिकोडी, अभिनव बसवलिंग महास्वामीजी नागनसुर ( तालुका अक्कलकोट ) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राजशेखर दड्डी, अरविंदअण्णा कित्तुरकर, प्रा. वाली यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या हस्ते बसवराज आजरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उदयराव जोशी, रामगोंडा पाटील, महेश सलवादे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.



