गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे म्हणाले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे गोरगरिबांचे कैवारी होते. त्यांनी देशाच्या शैक्षणिक व अन्य सर्वच क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. अनेक समाज उपयोगी उपक्रमात मोलाचे योगदान दिले आहे. शिवराज महाविद्यालयाच्या इमारतीचा पायाभरणी शुभारंभ देखील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या हस्तेच करण्यात आला होता. त्यांच्या कार्याचा आदर्श नव्या पिढीला समजला पाहिजे. अशा या थोर व्यक्तिमत्वाचा आदर्श आपण सर्वांनी घेणे आणि आपल्या जीवनाची वाटचाल समृद्ध करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे संचालक श्री.नंदनवाडे, प्रा. सुप्रिया व्हटकर, प्रा. पी.ए.काजी, प्रा. संकेत पाटील, प्रा. कोकणे यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.


