हत्तरगी (नामदेव पंढरी): डिचोली (गोवा) येथील राधाकृष्ण विद्यालयाचे जेष्ठ क्रीडा शिक्षक व मूळचे दड्डी गावचे सुपुत्र रऊफखांन पठान यांना आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त अविष्कार फौंडेशन इंडिया संस्थेतर्फे "राष्ट्रीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार हैद्राबाद येथील सालारजंग म्युझीयम सभागृहात एका शानदार कार्यक्रमात गृहमंत्री (कॅबिनेट) तेलंगणा सरकार (हैद्राबाद) मोहम्मद मेहमूद व चांद्रय्याजी (चेअरमन ह्युमन राईट्स कॉमिशन तेलंगना स्टेट (हैद्राबाद) यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला. या संस्थेतर्फे या पुरस्कारसाठी प्रत्येक राज्यातून एक राष्टीय व राज्यस्तरीय आदर्श शिक्षकाची निवड करण्यात येते. गोव्यातून ह्या पुरस्करासाठी रऊफखांन पठान यांची निवड करण्यात आली होती.
रऊफखांन पठान यांच्या गेल्या 33 वर्षापासूनच्या क्रीड़ा, संस्कृतिक व सामाजिक कार्याची दखल घेत तसेच यापूर्वी त्यांना मिळालेले तीन राज्यस्तरीय सरकारी पुरस्कारांची दखल घेत या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
क्रीड़ा शिक्षक रऊफखांन पठान याना आतापर्यंत अनेक पुरस्कारानी व सन्मान प्रशंसापत्रानी सन्मानित केले गेले आहे. क्रीड़ा शिक्षकी पेशा बरोबरच ते एक उत्कृष्ट एन.सी.सी. अधिकारी, राष्ट्रीय कबड्डी पंच, राष्ट्रीय खो-खो पंच, राष्ट्रीय अथलेटिक्स पंच व GCA चे प्रथम दर्जाचे क्रिकेट पंच म्हणून ख्यातनम आहेत. विशेष म्हणजे ते गेल्या 15 वर्षा पासून डिचोली तालुका शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आहेत तर राज्यस्तरीय संघटनेचे उपाध्यक्ष आहेत.
Congratulations pappa 😍
ReplyDelete