सकाळपासून महाप्रसाद वाटपास प्रारंभ
दुपारी तीन वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप सुरू राहणार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): दर महिन्याप्रमाणे सामानगड येथील श्री.भीमशाप्पा मठात आज मंगळवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा अमावस्याचा महाप्रसाद हसुरसासगिरीचे भक्त सागर भीमराव गुरव (इंजिनीयर पुणे) यांच्या वतीने आहे. महाप्रसादाला सकाळी सात वाजल्यापासून प्रारंभ झाला असून दुपारी 3 वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप होणार आहे. या महाप्रसादाचा लाभ सर्व भक्तांनी वेळेत उपस्थित राहून घ्यावा असे आवाहन मठातर्फे भिमशाप्पा दिवटी यांनी केले आहे.