वक्तृत्व स्पर्धेत तेरणी उर्दू विद्यामंदिरची कु.रिझका रियाज जमादार लहान गटात प्रथम
प्रश्नमंजुषा स्पर्धेत कु.बुशरा मुल्ला, कु.सफीन मुल्ला द्वितीय
गडहिंग्लज (प्रतिनिधी): ईद ए मिलाद उन नबी(पैंगबर) जयंती निमित्त "फिक्र ए अतफाल टिचर्स ग्रुप" गडहिग्लज व उर्दु विद्यामंदिर नेसरी यांच्या संयुक्त विद्यमाने आजरा,चंदगड, गडहिंग्लज व कागल या चार तालुक्यामधील उर्दु प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी घेण्यात आलेल्या वकृत्व स्पर्धेत तेरणी उर्दु विद्यामंदीरच्या कु.रिझका रियाज जमादार हिने लहान गटामध्ये प्रथम क्रमांक मिळविला. तर प्रश्नमंजुषा स्पर्धेत कु. बुशरा इम्तियाज मुल्ला व कु.सफीन राईसाब मुल्ला या दोघींनी द्वितीय क्रमांक पटकाविला.
या विद्यार्थिनींना आरीफा मोमीन, जुबेदा ताशिलदार, नसरीन जमादार, चाँद बाढवाले यांचे मार्गदर्शन लाभले. या तिन्ही विद्यार्थिनीनी यश मिळवत तेरणी गावचे व उर्दू विद्यामंदिरचे नाव लौकिक केल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. याबद्दल उर्दु विद्यामंदीरच्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.