🔘ओढे, नाले पुन्हा तुडुंब
🔘हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत वाढ
🔘निलजी बंधाराही पाण्याखाली, वाहतूक ठप्प
🔘गडहिंग्लजमध्ये कडगाव रोड नजीक झाड कोसळले
🔘बऱ्याच ठिकाणी गटारीचे पाणी रस्त्यावर
🔘धरणांच्या पाणी पातळीतही वाढ
![]() |
गडहिंग्लज: येथील कडगाव मार्गावरील एम.आर.हायस्कूलच्या बाजूला शिवराज महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाड कोसळले होते. |
संततधार पावसामुळे हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीतही कमालीची वाढ झाली आहे. विनाउसंत पाऊस सुरू असल्याने बऱ्याच ठिकाणी गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याचे चित्र दिसले. कुंबळहाळ येथील ओढ्याला पाणी आल्याने रस्त्यावर पाणी आले होते. तसेच भडगाव गावानजीकही पाणी रस्त्यावर थांबले होते. यामुळे या ठिकाणी वाहतूक धीम्या गतीने सुरू होते.
![]() |
गडहिंग्लज: येथील कडगाव रोडवरील शिवराज महाविद्यालयकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाड कोसळल्याने बॅरिकेट्स लावून हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला होता. |
गडहिंग्लज शहरातील भडगाव मार्गावर गटारीचे पाणी रस्त्यावर आले होते. तसेच कडगाव रोडवरील एम.आर. हायस्कूल नजीक शिवराज महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाड कोसळल्याने या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली होती. हे झाड विद्युत तारेवर कोसळल्याने तार तुटून पडले होते. खबरदारी म्हणून तातडीने या ठिकाणी बॅरिकेट्स लावून रस्ता बंद करण्यात आला होता.
रात्रभर झालेल्या पावसाने धरणांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे. या पावसाने तालुक्यातील ओढे, नाले ओसंडून वाहत आहेत. मध्यंतरी उसंत घेतलेल्या पावसाने कालपासून तालुक्यात जोर धरला आहे.
![]() |
निलजी: येथील बंधाऱ्यावरही पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. |
![]() |
गडहिंग्लज : येथे ठीकठिकाणी असे रस्त्यावर पाणी आले होते. |