हत्तरगी (वार्ताहर): धोंडगट्टे (तालुका हुक्केरी) येथे आजी-माजी सैनिक संघटनेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी सुभेदार संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात लक्ष्मण संतु पाटील, तुकाराम संतू पाटील, श्रीमती सुनिता सुनील तेऊरवाडे, श्रीमती पार्वती तुकाराम पाटील, श्रीमती वंदना तानाजी पाटील, श्रीमती मंगल जयवंत कांबळे, धोंडीबा रेडेकर, संजय पाटील, सुरेश पाटील, संतोष पाटील, अरुण शिंदे, सुनील पाटील, मनोज देसाई, पत्रकार नामदेव पंढरी यांच्यासह परिसरातील माजी सैनिक व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
माजी सैनिक बाळासाहेब परीट यांनी संघटना स्थापन करण्यामागचा उद्देश सांगून या संघटनेत ४१ सदस्य असून यातील २० निवृत्त व २१ कार्यरत सैनिक आहेत. यातील सात सैनिक हे सुभेदार पदावर कार्यरत असल्याचे सांगितले. देशसेवा करून गावात जनसेवा करण्याचा करण्याच्या उद्देशाने संघटना स्थापन केल्याचे प्रमुख पाहुणे रणजीत भागलकर यांनी सांगितले. यावेळी नामदेव पाटील, लक्ष्मण पाटील भैरू पाटील तुकाराम पाटील व परिसरातील माजी सैनिक उपस्थित होते. प्रारंभी शिवाजी आंबुलकर यांनी प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले. संघटनेचे अध्यक्ष भै रू पाटील यांनी आभार मानले.

