Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जपान-भारत सागरी सरावाचा समारोप


नवी दिल्ली (सौजन्य : पीआयबी):
भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या जपान-भारत सहावा सागरी सराव 2022, जिमेक्स-22(JIMEX 22) चा  बंगालच्या उपसागरात समारोप झाला. पारंपारिक स्टीम पास्टसह (परेड सह) दोन्ही बाजूंनी एकमेकांचा निरोप घेतला.

आठवडाभर चाललेल्या या सरावात,फ्लॅग ऑफिसर कमांडिंग ईस्टर्न फ्लीटचे  रिअर अडमिरल संजय भल्ला यांच्या नेतृत्वाखालील भारतीय नौदलाच्या जहाजांनी त्याचबरोबर कमांडर एस्कॉर्ट फ्लोटिला फोरचे रिअर अडमिरल हिराता तोशियुकी यांच्या नेतृत्वाखालील जपान मेरिटाइम सेल्फ डिफेन्स फोर्स (JMSDF) ची जहाजे इझुमो आणि ताकानामी यांनी भाग घेतला.

जिमेक्स-22 ( JIMEX 22), दोन्ही देशांच्या नौदलाने संयुक्तपणे केलेल्या काही अत्यंत जटिल सरावांचे साक्षीदार ठरले. दोन्ही देशांच्या सैन्याने आधुनिक स्तरावरील पाणबुडीविरोधी युद्ध, शस्त्राने गोळीबार आणि हवाई संरक्षण आदी युध्द कौशल्यांचा सराव केला. शिपबोर्न हेलिकॉप्टर, लढाऊ विमाने आणि पाणबुड्याही या सरावात सहभागी झाल्या होत्या. भारतीय नौदल (IN) आणि जपान मेरिटाइम सेल्फ डिफेन्स फोर्स (JMSDF)च्या जहाजांनी  जहाजे पुरवठा आणि सेवांसाठी परस्पर तरतुदीच्या करारानुसार परस्परांसमवेत  संयुक्तपणे हे अभियान आयोजित केले.

२०१२ मध्ये सुरू झाल्यापासून जीमेक्सचा दहावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या सरावाने दोन्ही देशांच्या नौदलांमधील परस्पर सामंजस्य आणि परस्पर कार्यक्षमता अधिक  मजबूत केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.