उत्सवासाठी देणगी व साहित्य देऊन सहकार्य करण्याचे भक्तांना आवाहन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): श्री सद्गुरू भिमशाप्पा महाराज मठ नौकुड सामानगड येथे सालाबादप्रमाणे दसरा उत्सव सप्ताह रविवार दि २५ सप्टेंबर पासून सुरु होत आहे. यानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या उत्सवासाठी तसेच महाप्रसादासाठी देणगी व साहित्य स्वरूपात मदत स्वीकारण्यात येत असून भक्तांनी सहकार्य करण्याचे आवाहन मठातर्फे भिमशाप्पा दिवटी यांनी केले आहे.
दि १ ऑक्टोबर रोजी सप्ताह समाप्ती व महाप्रसादाचे आयोजन केले आहे. या महाप्रसादाचा भक्तांनी लाभ घ्यावा तसेच या उत्सवासाठी आणि महाप्रसादासाठी देणगी स्वरूपात रोख रक्कम व साहित्य देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. याबाबत भक्तांनी भिमशाप्पा बाळकृष्ण दिवटी यांच्याशी संपर्क साधावा (07588869732, 9423840752) असे आवाहन करण्यात आले आहे.


