![]() |
मुगळी: अष्टविनायक विकास सेवा संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना संस्थापक सोमगोंडा आरबोळे यांच्यासह इतर. |
जरळी(वार्ताहर): मुगळी (तालुका गडहिंग्लज) येथील अष्टविनायक विकास सेवा संस्थाची निवडणूक बिनविरोध झाली. चेअरमनपदी निंगापा माने तर व्हाईस चेअरमनपदी प्रशांत महाडिक यांची निवड करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्हि. एस तोडकर यांनी काम पाहिले.यावेळी संस्थेचे संस्थापक व हिरा शुगरचे संचालक सोमगोंडा आरबोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
चेअरमन पदासाठी निंगापा माने यांचे नाव प्रा आप्पासाहेब आरबोळे यांनी सुचविले त्यास रामगोंडा पाटील यांनी अनुमोदन दिले.व्हा चेअरमन पदासाठी प्रशांत महाडिक यांचे नाव अर्जुन चौगुले यांनी सुचविले त्यास आप्पासाहेब पाटील यांनी अनुमोदन दिले.
सदस्यांमध्ये बाबासो आरबोळे, निंगापा माने, आप्पासाहेब पाटील, रामगोंडा पाटील, अर्जुन चौगुले, प्रा आप्पासाहेब आरबोळे, विनायक आरबोळे, प्रशांत महाडीक, तानाजी कुंभार,बाळाप्पा घस्ती, शारदा शिंदे, शांताबाई कांबळे यांचा समावेश आहे. यावेळी आपासो धुळाज, विवेकानंद स्वामी उपस्थित होते. बाबासाहेब आरबोळे, प्रा.आप्पासाहेब आरबोळे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत सचिव शिवानंद गड्डी यांनी केले.आभार प्रशांत महाडिक यांनी मानले.