हलकर्णी येथे डॉ. गंगाधर व्हसकोटी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा
हलकर्णी : ( सुनील भुईंबर ) समाजात जगत असताना गरीब कष्टकरी लोकांच्या अडचणीवर मात करून आदर्श निर्माण करा, जनसेवा हीच ईश्वर सेवा ह्या संत वचना प्रमाणे समाजातील उपेक्षित घटकासाठी आपले जीवन व्यतीत करून सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यातील जगण्याला गोडवा निर्माण करा असे प्रतिपादन हतरगी कारिमठाचे परम पुज्य गुरूसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी डॉ. गंगाधर व्हसकोटी यांच्या ५४ व्या वाढदिवसा निमित्य आयोजित कार्यक्रमात केले.
स्वागत शिवकुमार संसुद्दि यांनी केले. प्रास्ताविक माजी जि. प. सदस्य जयकुमार मुन्नोळी यांनी केले. या कार्यक्रमास षटस्थळ ब्रम्हि सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी ब्रम्हमठ उ. खानापूर, आडी सिद्धेश्वर महास्वामीजी कडलगे, भगवानगिरी महाराज रामनाथगिरी मठ नुल यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाटील होते. यावेळी जयसिंग चव्हाण, माजी जि.प. सदस्य शिवाजी खोत , 'गोड साखर' चे माजी संचालक अमर चव्हाण, गोकुळ संचालक अरुणकुमार डोंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज़िल्हाध्यक्ष ए. वाय.पाटील, आमदार राजेश पाटील यांची भाषणे झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करणेत आला .
![]() |
हलकर्णी : डॉ. गंगाधर व्हसकोटी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, गोकुळचे संचालक अरुणकुमार डोंगळे. |