मुगळी: येथील कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ पत्रकार दत्ता देशपांडे. यावेळी गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी, रमेश आरबोळे व इतर. मुगळी येथे सोमलिंग सामाजिक सेवा संस्था समितीच्या वतीने कार्यक्रम |
मुगळी (ता. गडहिंग्लज) येथे सोमलिंग सामाजिक सेवा संस्था समितीच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. सव्वा दोन कोटी रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात आलेल्या सोमलिंग मंदिरात सुरगीश्वर मठाचे गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी इंजिनीयर श्रीकांत साळोखे, अन्नदान सेवा देणारे सतीश धनवडे, विठ्ठल धनगर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात दत्ता देशपांडे यांनी वटपौर्णिमेचे महत्व सांगितले. तसेच अनेक धार्मिक, अध्यात्मिक उदाहरणे देऊन सुरगीश्वर मठाचे महास्वामी श्री गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या कार्याचाही आढावा घेतला.
सुरुवातीला सोमलिंग सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष रमेश आरबोळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी मंदिर बांधकामाचे काम अजून अपुरे असून त्यासाठी भक्तगण यांनी देणगी द्यावी. असे आवाहन केले. ए.बी. जाधव यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. विठ्ठल चौगुले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संस्थेचे सचिव दुंडाप्पा पाटील यांनी मंदिर बांधकामाचा जमा खर्च अहवाल सादर केला. यावेळी बाळगोंडा पाटील, अशोक महाडिक, ॲड. गजानन पाटील, श्रीपाद स्वामी, जरळी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक टि.एम.दुंडगे, सागर पोवार, श्रावण आरबोळे उपस्थित होते. रायगोंडा पाटील यांनी आभार मानले.