Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त ५०० पुस्तक भेटीचा आदर्शमाता प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम


कराड (वार्ताहर): छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त पाडळी(केसे) तालुका कराड येथील आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने राजर्षी शाहू महाराजांच्या पुस्तक भेटीचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी दिली आहे.  

विश्वास मोहिते म्हणाले, आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम  राबवीत असतो, येत्या २६ जून रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी होत आहे. या जयंतीनिमित्त छत्रपती शाहू महाराज यांचे विचार सर्वापर्यंत पोहोचावेत, त्यांच्या विचारावरती कार्यकर्त्यांनी वाटचाल करावी या उद्देशाने ५०० पुस्तक भेटीचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या "शाहू महाराज वसा आणि वारसा" या पुस्तकाच्या पाचशे प्रती विविध कार्यकर्ते, अधिकारी आणि नागरिकांना भेट देऊन हा उपक्रम साजरा करण्यात येणार आहे. याचा शुभारंभ लवकरच छत्रपती शाहू जयंतीचे औचित्य साधून कराड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.