जरळी( वार्ताहर) : मुगळी( तालुका गडहिंग्लज) येथील महात्मा गांधी वाचनालय व अभ्यासिका केंद्रामार्फत इयत्ता १०वी मध्ये प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या आदित्य धनवडे, वृषाली पाटील, निशा शिवारे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संरपच व सस्थेचे कार्यवाह बी. जी. स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.मुगळी : येथे दहावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी सरपंच बी.जी.स्वामी यांच्यासह इतर मान्यवर.
स्वागत ग्रंथपाल के. डी. धनवडे यांनी तर प्रास्ताविक सचिव आपासो जाधव यांनी केले. मुगळी हायस्कूलचा शंभर टक्के निकाल लागल्याबद्दल मुख्याध्यापिका विद्यादेवी लोहार, एम. आर. शिंदे, सागर आरबोळे, पी.आय.कदगल, एस. बी. कांबळे, एस. एस.खडकेकर, एम. डी. रणवरे, पी. पी.महाजन, डी. एन. संगमित्र, ए. एम. शिंत्रे या शिक्षकांचा वाचनालय व अभ्यासिका केंद्रामार्फत अभिनंदन ठराव करण्यात आला .
यावेळी सुरेश पाटील, शंकर माने, ईश्वर हुल्लोळी, बी. जी. स्वामी, गजानन कांबळे, आपासो जाधव, आपासो कदम, सागर आरबोळे, सुरेश मुसळे, विजय महाडिक, सुनिता चौगुले, पद्मजा सुतार, राजेंद्र मांग यांच्यासह वाचक उपस्थित होते.आभार श्रीपाद स्वामी यांनी मानले.