गडहिंग्लज(प्रतिनिधी): महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज आयुर्वेदिक महाविद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहात झाला. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विस्वस्थ डॉ.यशवंत चव्हाण हे होते.
स्वागत व प्रास्ताविक प्राचार्या डॉ.मंगल मोरबाळे यांनी केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठ परीक्षा मधील क्रमांक प्राप्त विद्यार्थी, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात यश मिळवलेले व कोरोना काळात रुग्णसेवा बजावलेल्या विद्यार्थ्यांचा चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आला. यावेळी डॉ. साळे व डॉ. चव्हाण यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी संस्था सचिव ॲड.बाळासाहेब चव्हाण, डॉ. दिग्विजय पाटील, डॉ. संगीता मनगुळे,डॉ. माधव पताडे, डॉ. रूपाली कोरी, डॉ.अजित मेतके, डॉ. अस्मिता कांबळे, डॉ. गणेश आडीलकर व इतर शिक्षक उपस्थित होते. आभार डॉ. राजदीप होडगे यांनी मानले.

