![]() |
| मयत बाहूबली देवणावर |
हत्तरगी (वार्ताहर) : पुणे -बेंगलोर महामार्गावर संकेश्वर नजीक कारने मोटरसायकलला जोराची धडक दिल्याने गडहिंग्लज तालुक्यातील निलजी येथील तरुण जागीच ठार झाला. बाहूबली आप्पासाहेब देवणावर(वय ३६) असे या तरुणाचे नाव आहे. या अपघाताची नोंद संकेश्वर पोलीस ठाण्यात झाली आहे.
घटनास्थळ व संकेश्वर पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की, बाहुबली देवणावर हे आपल्या मोटर सायकलवरून (क्रमांक एम एच, 09 पीएफडी 3309) गोटुर येथील पेट्रोल पंपावर कामाला जात होते. दरम्यान, हिरण्यकेशी साखर कारखाना जवळील ब्रिजवर कारने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये बाहुबली यांचा जागीच मृत्यू झाला. बाहुबली यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
बाहुबली हे गेली पाच वर्षे झाली कारेकाजी यांच्या पेट्रोल पंपावर डीसीएम म्हणून काम पाहत होते. गुरुवारी सकाळी साडे सहाच्या दरम्यान कामावर जात असताना कारने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली व हा अपघात घडला. संकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आप्पासाहेब यांचे बाहुबली हे एकुलते एक चिरंजीव होते. त्यांच्या या अपघाती निधनाने देवणावर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


