![]() |
पणजी : येथे 'धरोहर'च्या राष्ट्रार्पण प्रसंगी केंद्रीय वित्त आणि कार्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन, अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, गोव्याचे वाहतूक,पर्यटनमंत्री माविन गुदिन्हो व इतर. |
पणजी : (सौजन्य : पीआयबी ): गोव्यात शनिवारी “धरोहर”-राष्ट्रीय सीमाशुल्क आणि जीएसटी संग्रहालयाचे राष्ट्रार्पण केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते झाले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा भाग म्हणून वित्त मंत्रालय ६ ते १२ जून ह्या कालावधीत, आयकॉनिक वीक साजरा करत आहे. त्याचाच भाग म्हणून गोव्यात हा कार्यक्रम झाला.
अर्थमंत्र्यांनी हे संग्रहालय ज्या इमारतीत आहे, त्या 400 वर्षे जुन्या वास्तूमध्ये स्थापन असलेल्या, एकाच दगडातून बनवण्यात आलेल्या शिल्पकृतीवरील सोनेरी वाळू बाजूला सरकावून हे उदघाटन केले. या दुमजली निळ्या इमारतीचे आधीचे, म्हणजे पोर्तुगीज काळातील नाव ‘अल्फांडेगा’ असे होते. ही इमारत मांडवी नदीच्या काठी उभी आहे. यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी,गोव्याचे वाहतूक, पर्यटन आणि पंचायतराज मंत्री मावीन गुदीन्हो उपस्थित होते.