गडहिंग्लज :
आधुनिकतेच्या या जगात आय. टी. गतीने झेप घेणारे क्षेत्र आहे. आजच्या घडीला सर्वात महत्वाचे हे क्षेत्र बनले आहे. या क्षेत्रात अनेक नामांकित कंपन्या झपाट्याने प्रगती करत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअर करण्याची खूप संधी आहेत. याचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे संचालक व अरुण नरके फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. चेतन नरके यांनी केले. येथील शिवराज महाविद्यालयात आयोजित 'राज्यस्तरीय सॅक्स टू के २२' कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस एम कदम होते.

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक विना अनुदानित विभागाचे समन्वयक प्रा. आझाद पटेल यांनी केले. पाहुण्यांचा परिचय 'सॅक्स टू के २२' चे समन्वयक प्रा. बी. एस. पठाण यांनी करून दिला. या कार्यक्रमात गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे गरजेचे आहे. शिवाय कष्ट करण्याची जिद्द ठेवावी तरच जीवनात यशस्वी व्हाल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी आपल्यातील क्षमता वाढविण्याबरोबरच जाणिवेने अभ्यास केला पाहिजे. तरच जीवनात यशस्वी होण्यासाठी केलेले प्रयत्न तुमच्या आयुष्याला घडवेल असे त्यांनी सांगितलं. जीवनात कोणताही शॉर्टकट नाही, कष्टाशिवाय यशाला पर्याय नाही. तुमच्यातील टॅलेंट हे आजच्या स्पर्धेच्या जगात सिद्ध करण्याची गरज बनली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयत्नाला बळ देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे, असेही त्यांनी प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी आपल्याला विविध देशात काम करताना आलेले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले व विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला.
यावेळी शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे, उपाध्यक्ष ऍड. दिग्विजय कुराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी अध्यक्षीय मनोगतातून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पेपर व पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे परीक्षण केल्याबद्दल प्रा. मुळीक, प्रा. आजगेकर, प्रा. महेश भांदिगरे, प्रा. अचला नारायणगावकर, प्रा. प्रमिला गड्यान्नावर आदींचा सत्कार करण्यात आला.
प्रा. सौ. बिनदेवी कुराडे, श्री राजगोंडा पाटील, संचालक बसवराज आजरी, बीसीए विभाग प्रमुख प्रा. आर. डी. कमते, यांच्यासह अन्य मान्यवर विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. श्रद्धा पाटील यांनी केले, तर प्रा. रवी खोत यांनी सर्वांचे आभार मानले.
जाहिरात व बातमीसाठी संपर्क : गडहिंग्लज बुलेटिन न्यूज (GB News), गडहिंग्लज, कोल्हापूर
मोबाईल क्रमांक : 9844727598