Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणीतील पाणंद रस्त्यांची मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडून पाहणी

'सेवा पंधरवडा' च्या पार्श्वभूमीवर  बोरिमाळ परिसरात भेट देऊन घेतली माहिती




गडहिंग्लज (प्रतिनिधी) : 'सेवा पंधरवडा' च्या पार्श्वभूमीवर तेरणी येथील बोरीमाळ परिसरातील पाणंद रस्त्यांची मंडळ अधिकारी आप्पासाहेब जिनराळे व ग्राम महसूल अधिकारी अभिजीत डोंगरे यांनी पाहणी केली.



प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताला रस्ता मिळावा यासाठी राज्य शासन आग्रही आहे. यासाठी विविध योजनांच्या निधीचा समन्वय साधून समग्र योजना आणली जाणार आहे. या अनुषंगाने सेवा पंधरवडा अभियानाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 17 ते 22 सप्टेंबरच्या कालावधीमध्ये शिव पाणंद रस्त्यांचे सर्व्हेक्षण करणे, ज्या पाणंद रस्त्यांची नोंद निस्तार पत्रक / वाजिब उल अर्जामध्ये करण्यात आलेली नाही त्याची नोंद घेण्याबाबत कार्यवाही करणे, शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करुन देण्यासाठी संमती पत्र घेणे, रस्ता अदालत आयोजित करुन शेतरस्त्यांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, शेतरस्त्यांची मोजणी व सीमांकन करणे आदी कामे करण्यात येणार आहेत. सीमांकनासाठी रस्त्यांच्या किनारी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेत सर्व लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज या पाणंद रस्त्यांची पाहणी महसूल विभागाच्या वतीने या अधिकाऱ्यांनी केली.



यावेळी या परिसरातील कवळीकट्टे गावच्या सीमेपर्यंत, डोंगरा पर्यंत व पिंजारी वस्तीपर्यंत जाणारा रस्ता अशा तीन पाणंद रस्त्यांची माहिती घेण्यात आली. यावेळी ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.