कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर व एस टी डेपो कागल येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या भरारी पथकाने विविध गुन्ह्यामध्ये अटकावुन ठेवलेल्या वाहनांचा लिलाव करावयाचा आहे. वाहने बरीच वर्षे ठेवली असुन वाहन मालक खटला विभागातील दंड व थकीत कर भरत नसल्याने वाहने खराब व सडलेल्या अवस्थेत आहेत. वाहन मालक नोटीसा पाठवून देखील कोणताही प्रतिसाद देत नाहीत. अटकावुन ठेवलेल्या वाहन मालकधारकांनी वाहने खटला विभागातील दंड व थकीत कर भरुन सात दिवसाच्या आत आपली वाहने ताब्यात घ्यावीत अन्यथा सात दिवस पुर्ण झाल्यानंतर 82 वाहनमालकांची व बँक धारकांच्या कोणत्याही तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली आहे.
लिलाव प्रक्रीया शासन निर्णयानुसार करण्यात येत आहे. याची नोंद घ्यावी. लिलाव प्रकीया (एम एस टी सी ) या कंपनीमार्फ़त होणार आहे. तसेच हा लिलाव राज्य शासनाच्या नियंत्रणाच्या देखरेखे खाली होत आहे.

