Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणीच्या अशोक रावसाहेब देसाई हायस्कूलमध्ये राष्ट्रीय अभियंता दिन साजरा



गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी (ता. गडहिंग्लज) येथील अशोक रावसाहेब देसाई हायस्कूलमध्ये 15 सप्टेंबर  'राष्ट्रीय अभियंता दिन' साजरा करण्यात आला.



यावेळी भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे संचालक ए. बी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक सहाय्यक शिक्षिका दिपाली बंदी यांनी केले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. प्रमुख पाहुणे ए. बी. पाटील व मुख्याध्यापक के. बी. पाटील यांनी मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या कार्याविषयी माहिती दिली. आभार विद्यार्थी प्रतिनिधी भरतेस तेगनाळे यांनी मानले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.