Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आजरा तालुक्यातील सुलगावच्या सिद्धी देसाई एम. पी. एस.सी मधून राज्य कर निरीक्षक



आजरा (हसन तकीलदार ) :  सुलगाव (ता. आजरा) येथील कु. सिद्धी अनिल देसाई हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत राज्य कर निरिक्षक वर्ग-२(STI) पद संपादन केले.

     


कु. सिद्धी चे प्राथमिक शिक्षण सुलगाव शाळेत तर माध्यमिक शिक्षण व्यंकटराव हायस्कूल आजरा येथे झाले. पुढील शिक्षण साधना ज्युनिअर कॉलेज गडहिंग्लज येथून घेऊन, शासकीय महाविद्यालय कराड मधून बी.फार्मसी पदवी घेतली. प्राथमिक शाळेपासूनच तीने येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा, ४ थी, ७ वी तसेच एन.एन.एम्.एस. अशा अनेक शिष्यवृत्त्या मिळवल्या आहेत.  तीने बी. फार्मसी डिग्री घेतानाही चार वर्षे एफ्. एफ.ई. फाऊंडेशनची शिष्यवृत्ती मिळवत आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आपल्या घरी सुलगाव येथे एम. पी. एस. सी. चा अभ्यास सुरू केला आणि पहिल्याच प्रयत्नात तिला यश मिळाले. त्याबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

     


आपल्या या यशाचे श्रेय तिने आपले काका, आई-वडील यांच्यासह अंगणवाडी सेविकां पासून प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, काॅलेज महाविद्यालय प्राध्यापक तसेच स्वामी विवेकानंद क्लासेस मुरगूडचे शिक्षक आणि गंगामाई वाचन मंदीर व झेप अकॅडमी आजराचे ग्रंथालय स्टाफ व मार्गदर्शन लाभलेल्या सर्व शिक्षक आदींना देत असलेचे सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.