संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
गडहिंग्लज (प्रतिनिधी): रावसाहेबआण्णा कित्तूरकर (जागृती) ज्युनिअर कॉलेजच्या मुलांच्या व्हॉलीबॉल संघाने शिवराज कॉलेज गडहिंग्लज येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये १९ वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला. या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
कित्तूरकर ज्युनिअर कॉलेजची क्रीडा परंपरा अबाधित राखणाऱ्या या संघात अर्थव सुतार, सक्षम जगताप, सुशांत कासारकर, कार्तिक तोडकर, विक्रांत तोडकर, दिगंबर बारड, किसन प्रजापती, आदेश पाटील, आदित्य दोरुगडे, आविष्कार मांजरे, पार्थ चौगुले या खेळाडूंचा समावेश होता.
या खेळाडूंचा सत्कार प्राचार्य श्रीरंग तांबे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रा.स्वाती क्षीरसागर, प्रा. पुंडलिक रक्ताडे, उपमुख्याध्यापक बी. जी. कुंभार उपस्थित होते. या खेळाडूंना प्रा. दयानंद ग्वाडी, अनिल चौगुले व सुभाष तिप्पे यांचे मार्गदर्शन लाभले.