अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने पुरस्कारासाठी निवड
गडहिंग्लज (प्रतिनिधी): अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने दिला जाणारा 'महाराष्ट्राचे ग्रामरत्न सरपंच' पुरस्कारासाठी बुगडीकट्टी ग्रामपंचायतीचे सरपंच दयानंद देसाई यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कार निवडीचे पत्र परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील (कुर्डूकर) यांनी सरपंच श्री. देसाई यांना पाठवले आहे. त्यांच्या या निवडीने गावच्या नावलौकिकात पुन्हा भर पडली असून त्यांचे कौतुक होत आहे.
सरपंच दयानंद देसाई यांनी आतापर्यंत सर्व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने राबविलेली विकास कामे -
ग्रामपंचायत बांधकाम नूतन इमारत २५ लाख रुपये निधी तसेच पंधरा वित्त आयोग निधीतून पाच लाख रुपये असे ३० लाखाची अद्यावत इमारत, गावातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक दरात पिण्यासाठी आरो प्लांट उभारणी १५ वित्त आयोगातून पाच लाख ३० हजार निधी, गावातील नागरिकांना बसण्यायोग्य बसस्थानक निर्मिती, विम्याच्या माध्यमातून बुगडीकट्टी गावातील नागरिकांना विमा कवच देऊन त्यातून दोन वेळा विमा ग्राम केलेले आहे. या माध्यमातून बुगडीकट्टी ग्रामपंचायतीस दोन लाख इतके भरचौस बक्षीस मिळवून दिले आहे, वाडी वस्ती मधील नागरिकांना येण्या जाण्यासाठी अडचणीत असणारी मोरी बांधून देऊन शाश्वत अडचण दूर केले आहे त्यासाठी पंधरा लाख निधी खर्च केले आहे, गावातील अंतर्गत व वाढीवस्तीतील रस्त्यासाठी ७० ते ८० लाख रुपये इतक्या रकमेचे रस्ते केले आहेत, गावामध्ये एकूण ४२ महिला बचत गटाची निर्मिती करण्यास प्रोत्साहन देऊन महिला वर्गाना सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या माध्यमातून विविध शेती व पशुपालन करण्यास प्रेरणा मिळत आहे व महिलांना बचतीची सवय लागलेली आहे, गावातील शैक्षणिक गुणवता सुधारण्यासाठी १५ वा वित्तच्या माध्यमातून अंगणवाडी बोलकी केलेली आहे. तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्र या ठिकाणी आवश्यक सुख सोयी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे, यापूर्वी माझा एलआयसी मध्ये मानांकित असणारा एमडीआरटी अमेरिका पुरस्कार, महाराष्ट्र आयडॉल पुरस्कार २०२४, नॅशनल अवॉईस बेळगावी यांच्याकडून सन्मान करण्यात आला आहे.
प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना दरवर्षी शालेय वस्तू स्वरूपात बक्षीस म्हणून मिळावे यासाठी विद्यामंदिर बुगडीकट्टी शाळेमध्ये दहा हजार रुपये वैयक्तिक ठेव म्हणून ठेवण्यात आले आहे, मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता योजना अंतर्गत ग्रामपंचायत मध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दहा लाख रुपयाचा विमा कवच देण्यात आले आहे, बुगडीकट्टी गावामध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम करत असणाऱ्या सर्व कामगारांना २०२८ पासून आदर्श कामगारांचे निवड करून त्यांना सरपंच अवॉर्डने सन्मानित केले जाते. आतापर्यंत लोकांचा सन्मान करण्यात आला आहे, १ मे कामगार दिनाचे औचित्य साधून बुगडीकट्टी गावातील सर्वच खाजगी व सरकारी सर्व कामगारांचा सन्मान करण्यात आला आहे, गावातील सर्वच आजी-माजी सैनिक संघटना यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान केलेला आहे, विधवा महिलांना स्वाभिमानाने समाजात वावरता यावे यासाठी विधवा हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. त्यांना समाजात विविध कार्यक्रमांमध्ये सामावून घेण्यासाठी आवाहन करण्यात आले, विजेची बचत व्हावी व शाळेत मुलांना अभ्यासात खंड पडू नये यासाठी गावातील दोन प्राथमिक शाळेसाठी सोलर सिस्टिम बसवण्यात आले.
ग्रामपंचायत सदस्यांच्याकडून व गावातील नागरिकांच्याकडून लोकसभागातून व श्रमदानातून नळ पाणीपुरवठा योजनेची कामे व सार्वजनिक हिताची कामे विनामूल्य केले जातात, गावच्या विकासासाठी घरपट्टी पाणीपट्टी वेळेत भरणे हे महत्त्वाचे आहे याची जनजागृती करण्यात येते. दरवर्षी ९० टक्केहून अधिक वसुली करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केला जातो, बुगडीकट्टी गावासाठी जलजीवन योजना मंजूर असून त्यासाठी एक कोटी ९ लाख इतका भरघोस निधी मंजूर आहे व काम चालू स्थितीत आहे, बुगडीकट्टी गावामध्ये दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात असून त्यासाठी लागणारे शेतकऱ्यांसाठी आधुनिक बी बियाणे आरोग्य सेवा शेती विषयक मार्गदर्शन कृषी विभागाचे मदत घेऊन शिबिर आयोजित करण्यात येते, गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न सोडवण्यासाठी बीपी शुगर महिलांचे हिमोग्लोबिन, नेत्र तपासणी यासारखे विविध आजारांचे शिबिर तज्ञ डॉक्टरांच्या कडून आयोजित करण्यात येते, गावातील गरजू लोकांना ७० हुन अधिक घरकुल मंजूर करून देण्यात आले आहे, चालू वर्षे देखील पुन्हा एकदा विमा ग्राम व भीमा स्कूल करून हॅट्रिक साधण्याचा प्रयत्न आहे, बालविवाह रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जाते व त्याची माहिती देण्यात येते, आतापर्यंत आमच्या गावामध्ये एकही बालविवाह झालेला नाही, निराधार मुलांना दत्तक घेण्याचे काम आमच्या गावांमध्ये चालू आहे तसे काम दानशूर व्यक्तीकडून करण्यास प्रोत्साहन दिले जाते, तालुका व जिल्हास्तरीय पात्र खेळाडूंना आर्थिक मदत करून त्यांना प्रोत्साहन करण्यात येते व तशा खेळाडूंचा कौतुक १५ ऑगस्ट व २६ जानेवारी च्या निमित्ताने करण्यात येतो.
लोकांनी लोकसहभागातून तयार केलेला रस्ता गेले अनेक वर्ष प्रलंबित असणारा शेतकऱ्यांचा तडजोडीने प्रश्न मिटवून पानंद रस्ता त्यांच्या सातबारावर नोंदवून सदर रस्ता करून देण्यात आला. त्यापासून २०० हून अधिक शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी कायमस्वरूपी मार्ग करून दिला आहे, गावातील अंगणवाडीसाठी दोन गुंठे जागा खरेदी करून घेतले. दलित वस्ती येथे तळदेव मंदिर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून घेतले व त्याचे बक्षीस पत्र करून घेतले, स्पर्धा परीक्षेतून सरकारी नोकरी प्राप्त करणाऱ्या नूतन नोकरदाराचा झेंडावंदनाचा मान देऊन त्यांचा सन्मान केला जातो, अत्यंत गरीब व दलित समाजातील एक विद्यार्थिनी एमबीबीएस डॉक्टर पदवी पूर्ण केल्याबद्दल त्यांना बोलवून झेंडावंदनाचा मान देऊन त्यांचा संपूर्ण कुटुंबाचा नागरी सत्कार करण्यात आला, बुगडीकट्टी गावामध्ये बेळगाव व गडहिंग्लज डेपोच्या गाड्या मुक्काम येतात चालक व वाहक यांना झोपण्याची सोय व्हावी यासाठी सरपंच केबिन मध्ये त्यांची सोय करण्यात आली आहे.अशा अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सर्व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे सहकार्याने सरपंच दयानंद देसाई यांनी केला आहे. या सर्व कामांची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा पुढील महिन्यात पार पडणार आहे.



