मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांचे आवाहन
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन 2025-26 मध्ये जिल्हा परिषद स्वनिधीमधून 50 टक्के अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र वाटप आणि 75 टक्के अनुदानावर विधवा, परितक्त्या दाद्रियरेषेखालील महिलांना 2 शेळी गट वाटप योजना अशा योजना राबविण्यात येत असून पात्र लाभार्थीनी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केले आहे.
या योजनांसाठी निकष खालीलप्रमाणे -
1.50 टक्के अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र वाटप- लाभार्थीकडे लहान मोठी किमान 5 जनावरे असावीत, लाभार्थीकडे वैरण उत्पादनासाठी जमीन असावी, लाभार्थीकडे वीज जोडणी असावी, लाभार्थीने इतर योजनेतुन कडबाकुट्टी यंत्राचा लाभ घेतलेला नसावा. 2.75 टक्के अनुदानावर विधवा,परितक्त्या, दाद्रिय रेषेखालील महिलांना 2 शेळी गट वाटप - ही योजना जिल्ह्यातील विधवा, परितक्त्या किंवा दारिद्रय रेषेखालील महिला लाभार्थीसाठी आहे, योजनेतील लाभार्थीचे वय 18 ते 60 वर्ष या दरम्यान असावे, लाभार्थीकडे शेळीपालनासाठी पुरेशी जागा उपलब्ध असावी.
योजनांचे अर्ज दि. 15 ते 30 सप्टेंबर अखेर पशुवैद्यकिय दवाखान्यांमार्फत पंचायत समिती स्तरावर स्विकारण्यात येतील. या संदर्भात नजिकच्या पशुवैद्यकिय दवाखान्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले.

