गडहिंग्लज (प्रतिनिधी): शिवराज महाविद्यालयात मिरज येथील ‘महर्षी डॉ.बापुजी साळुंखे महाविद्यालयात पार पडलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती युवा महोत्सवातील विजेते विद्यार्थी कलाकार व सेट उत्तीर्ण प्राध्यापकांचा सत्कार संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम. कदम होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक डॉ. अशोक मोरमारे यांनी केले.
या कार्यक्रमात प्रमूख पाहुणे नेसरीच्या टी. के. कोलेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. भांबर यांनी आपल्या मार्गदर्शनात शिवराज मध्ये आमच्यावर जे संस्कार झाले आहेत. त्यामुळे आम्ही खऱ्याअर्थी घडलो आहोत. त्यावेळी आम्हाला ज्ञानार्जन करणारे प्राध्यापक यांचे योगदान मोलाचे होते. हे मी जवळून पाहिले असल्याचे त्यांनी सांगितले. शिवराजने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे अत्यंत नेटके असे नियोजन करून भविष्यातील संधी प्राप्त करून घेण्यास शिवराजने आपले कर्तृत्व सिध्द केले आहे. अनेक महाविद्यालयांना प्राचार्य पुरविणारे हे महाविद्यालय आहे.
यावेळी दैनिक 'तरूण भारत संवाद' चे पत्रकार जगदीश पाटील यांनी कलागुणांच्या माध्यमातून खरा विद्यार्थी घडतो. कलेतून यशस्वी होणारे विद्यार्थी जीवनात कधीच मागे पडत नाहीत. महोत्सवाच्या माध्यमातून विदयार्थ्यांनी कलेतून आपले करिअर उज्वल करावे. असे त्यांनी स्पष्ट केले. प्राचार्य डॉ.एस.एम. कदम यांनीही सर्वांना मार्गदर्शन केले. शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांनी यशाचा सार्थ अभिमान वाटतो असे शिवराजचा विद्यार्थी हा क्रीडा क्षेत्राबरोबरच कला क्षेत्रात देखील यशस्वी होत असल्याने समाधान वाटत असल्याचे त्यांनी व्यक्त केले. या महाविद्यालयाचे डझनभर विद्यार्थी, प्राध्यापक सेट उत्तीर्ण होत आहेत हे आम्हाला अभिमानास्पद आहे असे प्रतिापादन डॉ. अनिल कुराडे यांनी व्यक्त केले.
मध्यवर्ती युवा महोत्सवात शास्त्रीय गायन मध्ये प्रथम क्रमांक विजेते अर्णव मच्छिंद्र बुवा, शास्त्रीय सुरवाद्य मध्ये द्वितीय क्रमांक विजेते- निमेश गिरीष देवार्डे, युवा महोत्सव मार्गदर्शक डॉ. रंगराव हेंडगे, प्रा.डी.यु.जाधव, प्रा.रवी खोत, युवा महोत्सव समन्वयक डॉ.ए.जी. हारदारे व लोककलेतील यशस्वी झालेले विद्यार्थीनी कलाकार तसेच सेट उत्तीर्ण डॉ.अल्ताफ नाईकवाडे, प्रा. विक्रम शिंदे, साहिल समडोळे, अक्षय तेलवेकर, दिपीका खांडेकर, बियामा वाटंगी, गिरीराज पाटील, राजश्री दळवी, प्रियांका पाटील, दिपीका कुलकर्णी, मधुरा हराडे, बसवराज मगदूम, गजानन कुलकर्णी आदींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ.रंगराव हेंडगे, मधुरा हराडे, विक्रम शिंदे, गजानन कुलकर्णी, बसवराज मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी संचालिका प्रा.सौ. बिनादेवी कुराडे, नॅक समन्वयक प्रा. किशोर अदाटे यांच्यासह प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रद्धा पाटील यांनी केले. आभार डॉ.एस.बी.माने यांनी मानले.





