अभियंता दिनानिमित्त आयोजन ; तीन गटात पार पडल्या स्पर्धा
हिडदुग्गी पेंट्सने केले प्रायोजकत्व
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज येथील आर्किटेक अँड इंजिनियर्स वेल्फेअर असोसिएशन मार्फत साधना हायस्कूल येथे अभियंता दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हिडदुगी पेंट्स यांनी प्रायोजकत्व स्वीकारले होते.
पहिली ते तिसरी गटात 125, चौथी ते सहावी गटात 190, सातवी ते दहावी गटात 132 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे उदघाटन साधना शिक्षण संस्थेचे संचालक अरविंद बारदेस्कर यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप पाटील यांनी केले. श्री. बारदेस्कर यांनी असोसिएशनने मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी माध्यम उपलब्ध करून दिल्याबद्दल कौतुक केले. कार्यक्रमाला असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, राजेंद्र देशमाने, सचिव अमित मिसाळ, खजिनदार प्रकाश इंगळे यांच्यासह असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


