Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आजरा येथे संवेदना फाऊंडेशनतर्फे भव्य रक्तदान शिबिर ; १६० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग



आजरा(हसन तकीलदार): मानवतेचा संदेश देत सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी संवेदना फाऊंडेशन आजरा यांच्या वतीने पं. दीनदयाळ विद्यालय, आजरा येथे भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल १६० रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान करून आपली समाजनिष्ठा दाखवून दिली.

   


या शिबिराचे उदघाटन महिला शक्ती टीमच्या सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. संवेदना संजीवनी टीम व संजीवन ब्लड बँक, कोल्हापूर यांच्या सौजन्याने हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले. रक्तदात्यांचा सन्मान करण्यासाठी संवेदना फाऊंडेशनतर्फे विशेष टी-शर्ट भेट देण्यात आले.या उपक्रमासाठी डॉ. प्रवीण निंबाळकर, डॉ. सुरजीत पांडव, संजय हरेर तसेच संजीवनी टीम सदस्यांचे विशेष सहकार्य लाभले.


ह्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आजरा, गडहिंग्लज , चंदगड आणि भुदरगड तालुक्यातील गरजू रुग्णांना मोफत रक्तसेवा पुरविली जाते. गेल्या ३ वर्षात जवळपास ४५ गरजू रुग्णांना मोफत रक्तसेवा पुरविली असल्याचे सांगण्यात आले.

       

यावेळी म्हाळसाकांत देसाई (नायब तहसीलदार, आजरा), डॉ. सुधीर मुंज (अध्यक्ष, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, आजरा), भुषण पाटील (तालुका कृषी अधिकारी),  संजीव देसाई (प्राचार्य, पं. दीनदयाळ विद्यालय, आजरा), रामकृष्ण मगदूम (प्राचार्य, नव कृष्णा व्हॅली स्कूल, उत्तूर), संवेदना फाऊंडेशनचे अध्यक्ष  अण्णाप्पा पाटील, उपाध्यक्ष  पांडुरंग पाटील, चेतन घाटगे, सौ. गिताताई पोतदार, जयंत पडते, किशोर गिलबिले, संजय भोसले, हरीश पोवार, संतराम केसरकर, सुरेश देशमुख, जयवंतराव पन्हाळकर यांच्यासह सर्व संवेदना सदस्य संख्येने उपस्थित होते.



सामाजिक बांधिलकीचा संदेश


या महारक्तदान शिबिरातून “रक्तदान हेच जीवनदान” हा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. युवक, महिला विविध सामाजिक घटकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम आजरा तालुक्यासाठी एक प्रेरणादायी व संस्मरणीय सोहळा ठरला आहे.

रक्तदानाने नवजीवन मिळते, त्यामुळे प्रत्येकाने आयुष्यात किमान एकदा रक्तदान करणे हीच खरी समाजसेवा आहे, असा संदेश संवेदना फाऊंडेशनच्या या उपक्रमातून देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.